Fri. May 7th, 2021

नववर्षात या दिवशी बॅंका बंद राहणार, पाहा पूर्ण यादी

नववर्षाची सुरुवात झालेली आहे. 2020 हे वर्ष सुट्ट्यांच असणार आहे. या वर्षात रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण 90 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

यासोबतच रिझर्व्ह बॅंकेकडून 2020 वर्षातील कोणत्या दिवशी बॅंका बंद राहतील, या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

1 जानेवारी 2020 रोजी भारतात 67,385 बाळांचा जन्म

आपण या बातमीतून कोणत्या दिवशी बॅंका बंद असतील हे पाहणार आहोत. अनेकदा बॅंकाची काम उरकरण्याच्या घाईत सुट्ट्यांच्या दिवशीही खातेधारक बॅंका गाठतात.

बॅंका कोणत्या दिवशी बंद असतात, हे माहिती नसल्याने हा घोळ होतो. त्यामुळे आपण या बातमीतून बँका कोणत्या दिवशी बंद असणार हे जाणून घेऊयात.

नववर्षाच्या सुरुवातीस महागाईचा दणका, सिलेंडरची दरवाढ

या दिवशी बँकांना असेल सुट्टी

बुधवार, १५ जानेवारी, पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी
रविवार, २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन
गुरूवार, ३० जानेवारी, वसंत पंचमी
शुक्रवार, २१ फेब्रवारी, महाशिवरात्र
मंगळवार १० मार्च, होळी
बुधवार, २५ मार्च, उगादी, मध्यप्रदेश
गुरूवार, २ एप्रिल, राम नवमी
सोमवार, ६ एप्रिल, महावीर जयंती
शुक्रवार, १० एप्रिल, गुड फ्रायडे
मंगळवार, १४ एप्रिल, डॉ.आंबेडकर जयंती
शुक्रवार, १ मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिवस
गुरूवार, ७ मे, बुद्ध पोर्णिमा
शुक्रवार, ३१ जुलै, बकरी ईद
सोमवार, ३ ऑगस्ट, रक्षाबंधन
मंगळवार, ११ ऑगस्ट, जन्माष्टमी
शनिवार, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन
रविवार, ३० ऑगस्ट, मोहरम
शुक्रवार, २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती
मंगळवार, २६ ऑक्टोबर, विजयादशमी
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, ईद ए मिलाद
शनिवार, १४ नोव्हेंबर, दिवाळी
सोमवार, १६ नोव्हेंबर, भाऊबीज
सोमवार, ३० नोव्हेंबर, गुरूनानक जयंती
शुक्रवार, २५ डिसेंबर, ख्रिसमस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *