Fri. Sep 30th, 2022

बॅंकांची कामं उरकून घ्या; सरकारी बॅंक सलग पाच दिवस राहणार बंद

नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. बॅंकेची काही कामं असतील तर येत्या दोन दिवसात उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बॅंकांचे कामकाज सलग पाच दिवसांठी बंद राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना बॅंकांची काही कामं असतील त्यांना लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे. महिना अखेरीस सरकारी बॅंक थेट 30 सप्टेंबरला उघडणार आहे. बॅंकाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसाच्या संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे सामन्या नागरिकांना याचा फटका बसणार असल्याचे म्हटलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विलीनाकरणाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बॅंकांनी सुट्टींचा योग साधत दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी विरोध करण्यासाठी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरणार आहेत.

त्याचबरोबर 28 आणि 29 सप्टेंबर रोजी शेवटचा शनिवार आणि रविवार असल्यामुळे बॅंका बंद राहणार आहे.

त्यामुळे 25 सप्टेंबरपासून सलग पाच दिवस बंद राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.