Tue. Jun 28th, 2022

बाप्पाला आंब्यांची आरास

बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय्यतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी  अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे बुधवारी ससूनमधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम , दिव्यांग  आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे . आंब्यांची आरास पाहण्यासाठी भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली आहे. आंबा महोत्सवनिमित्त मंदिरामध्ये पहाटे ४ वाजता प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ ते १२ गणेश याग, दुपारी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री ९ वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे.

बाप्पाला ११०० आंब्यांची आरास

मुंबईतील शिवाजी पार्कमधील उद्यान गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. या मंदिरात भाविकांना आकर्षित करते ती म्हणजे आजच्या दिवशी केली जाणारी आरास. यावर्षी देखील ११०० आंबे वापरुन ही आरास तयार करण्यात आली. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सहपत्नीक बाप्पाची आरती केली. यावेळी मनसे नेते नितीन नांदगावकर ,संदीप देशपांडे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.