Jaimaharashtra news

पती-पत्नीच्या वादात मुलांचा मृत्यू

बारामती: पती-पत्नीच्या भांडणातून पत्नीने रागाच्या भरात पोटच्या मुलांना खाडीत फेकून दिलं आणि स्वतः देखील उडी घेतली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला आहे. पतीने आणि शेजारच्यांनी पत्नीला दगड खाणीतून बाहेर काढले. पण या दगड खाणीत बुडून दोन बालकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना बारामती तालुक्यातील पिंपळी गावात घडली असून शुक्रवारी रात्री पत्नी अंजली आणि अतुल यांचं कडाक्याचे भांडण झाले आणि याच रागात पत्नीने शनिवारी पहाटे आपल्या मुलांना पिंपळी येथील दगड खाणीत दोन मुलांना फेकून दिले आणि स्वतः उडी घेतली.दिव्या आणि शौर्य अशी मृत मुलांची नावे असून बारामती शहर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत

 

Exit mobile version