गावठी पिस्तूलातून स्वतःवर गोळ्या झाडून 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
बारामतीमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गावठी पिस्तूलातून स्वतःवर गोळ्या झाडून तिनं आपलं आयुष्य संपवलं. बारामतीच्या सुर्यानगरी भागात ही घटना घडलीय.
सायली उर्फ संध्या मानसिंग बळी असं या विद्यार्थ्यिनीचं नाव आहे. ती मागच्या वर्षी शिक्षणासाठी बारामतीत आली होती.
सायलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र नैराश्यातून तिनं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.