Thu. May 19th, 2022

पोलीस झिंगाट आणि गावकरी बंदोबस्तात

गणेशोत्सवाचा आनंद राज्यातील सर्व जनता घेत आहे त्यात ड्युटीवर असलेले कर्मचारी देखील मागे नाहीत भिगवण पोलिसांनी आज सातव्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये बसवलेल्या गणपतीचे विसर्जन वाजत गाजत केले.

पारंपारिक वाद्याच्या तालावर आणि झिंगाट गाण्याच्या तालावर भिगवणच्या सिंघम पोलिसांनी दबंग डांस केला यामुळे पोलिस उत्सवात ग्रामस्थ बंदोबस्तात अशी परिस्थिती झाली होती.

अतिशय आनंदात विसर्जन मिरवणुकीत सर्वच पोलिसांनी सहभाग घेऊन भिगवणच्या मुख्य बाजार पेठेतुन गणेशाची मिरवणुक काढली आणि आपल्या लाडक्या गणेशाला निरोप दिला.

पोलिसांचा झिंगाट डांस पाहताना ग्रामस्थांची आणि बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली, सतत जनतेला बंदोबस्त देणाऱ्या आणि शिस्त लावायचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना नाचताना पाहून अनेकांना हसू आवरत नव्हते.

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे, गणेशोत्सवाचा आजचा सातवा दिवस आहे, सातव्या दिवशी काही ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते.

भिगवण पोलिसांनीही आपल्या गणपतीचे विसर्जन केले, मात्र या विसर्जनावेळी पोलिस नाचण्यात दंग तर भिगवणकर जनता बंदोबस्तात असे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.