Tue. Jun 2nd, 2020

शरीरसंबंधांना नकार, बारबालेचे कपडे उतरवून मारहाण!

डान्सबारमधील बारबाला या केवळ डान्सर्स असतात, त्या शरीरविक्रय करत नाहीत, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र हैदराबाद येथील डान्सबारमधील घटनेने एक भीषण वास्तव समोर आलं आहे.

डान्सबारमधील बारबाला या केवळ डान्सर्स असतात, त्या शरीरविक्रय करत नाहीत, असं वारंवार सांगितलं जातं. मात्र हैदराबाद येथील डान्सबारमधील घटनेने एक भीषण वास्तव समोर आलं आहे. बारमधील कस्टमरशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याबद्दल एका बारबालेला तिचे कपडे उतरवून मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हे करणाऱ्या तिच्याच 4 महिला सहकारी होत्या तसंच 1 पुरूषदेखील होता.

बारबालेवर शरीरसंबंधांसाठी दबाव!

पीडित बारबालेने काही महिन्यांपूर्वीच हैदराबादच्या बेगमपेट परिसरातील डान्सबारमध्ये काम करायला सुरूवात केली होती.

मात्र या बारमध्य़े तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी होत असे.

मात्र या गोष्टीला तिने नकार दिल्यामुळे तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला.

तिने कस्टमर्सशी शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्यामुळे चिडून तिच्या सहकाऱ्यांनी तिचे कपडे काढून तिला मारहाण केली.

तिला मारहाण करणाऱ्यांमध्ये 4 महिला सहकाऱ्यांबरोबरच एका पुरुषाचाही समावेश होता.

या प्रकरणी पीडित बारबालेने पंजागुट्टा पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी यावर कारवाई करत चारही महिला सहकाऱ्यांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी असणारा पुरूष अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *