Tue. Mar 9th, 2021

स्थूलता कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेआधी आणि नंतर काय काळजी घ्याल…

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून डॉक्टरचा घ्यावा सल्ला…

सध्या लठ्ठपणामुळे पिडित अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. पण काही केल्या वजन कमी होत नसल्याने डॉक्टरांकडे येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढतेय. अशा स्थितीत डॉक्टर संबंधित रूग्णाचे वजन जास्त असल्यास आणि शस्त्रक्रियेस पात्र असल्यास बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला हा डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी दिला आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा एक उत्तम पर्याय सांगितला आहे. देतात ही शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर वजन पटकन कमी होत नाही, यासाठी काही महिने लागतात. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी शस्त्रक्रिया करून घेण्यापूर्वी आणि नंतरही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून योग्य ती काळजी घेतल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होऊ शकते. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा हा एक आजार असून अन्य आजारांना यामुळे आपसुकच निमंत्रण दिले जात आहे. कित्येक वर्षांपासून लठ्ठपणाने त्रस्त असणारे लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पर्य़ायांचा वापर करताना आपण अनेकदा पाहतो. मुळात वजन कमी करणं हे खूपच अवघड गोष्ट असते. परंतु, वजन कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. ज्यामुळे लठ्ठपणाने पिडीत रूग्णांना वजन पटकन कमी करता येऊ शकते.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही जठर आणि लहान आतडं यावर दुर्बिणीतून केली जाणारी शस्त्रक्रिया असून त्यामध्ये फक्त दोन ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं. विशेषतः लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्लीव्ह गॅस्ट्रोटोमॅमी आणि गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया केली जात आहे. पण शस्त्रक्रियेसह आहारात आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणंही गरजेचं आहे. यामुळे वजन वाढीवर नियंत्रण मिळता येऊ शकेल. लठ्ठपणामुळे होणाऱ्या विकारांची संख्या सर्वाधिक आहे. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेमुळे भूक कमी होणं, हार्मोनल बदल होऊ लागतात. यामुळे अतिरिक्त वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. वजन कमी झाल्यास लठ्ठपणा आणि या सगळया आजारांवर खात्रीने कायमची मात करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेमुळे हृदयरोग, स्लीप अप्निया, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांध्यातील वेदना, संधीवात, पीसीओएस आणि लठ्ठपणाशी संबंधित बर्‍याच कर्करोगाचा धोका कमी होतो.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कोणी करून घ्यावी :

१ ओबेसिटी अँण्ड मेटाबोलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया (ओएसएसआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)ची मात्रा ३५ किलोच्या पुढे असलेली व्यक्ती बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी पात्र आहे.

२ बीएमआय इंडेक्स ३० किलो तसेच टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल यातील कोणताही आजार असलेली व्यक्ती ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकते.

३ संबंधित रूग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे का हे पडताळून पाहिल्यानंतर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.

४ शस्त्रक्रियेपूर्वी रूग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्याला आहाराशी संबंधित काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या जातात. प्रत्येक व्यक्तीच्या वजनानुसार आहारातील तथ्य ७ ते १५ दिवस असू शकते.

५ शस्त्रक्रियेपूर्वी कार्बोहायड्रेटयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावेत. साखर न खाणे अतिशय उत्तम ठरू शकते. याशिवाय धुम्रपान आणि मद्यपान शक्यतो टाळणे आवश्यक आहे.

६ वैद्यकीय चाचणीत रूग्णाच्या शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे, लोह किंवा कॅल्शियमची मात्रा कमी असल्यास शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रूग्णासाठी पूरक आहार सुरू केला जातो.

७ बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबाबत रूग्णांच्या मनातील शंका आणि भिती दूर होणं खूप महत्वाचे आहे. म्हणूनच शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर काय करावेत?

१ बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला २४ तास काहीही खायला दिले जात नाही.

२ शस्त्रक्रियेनंतर सुरूवातीचे १५ दिवस रूग्णाला पातळ पदार्थ खायला दिले जातात. त्यानंतर हळूहळू हलका आहार दिला जातो. पटापट खाल्ल्याने छातीत दुखणे किंवा उलट्या होऊ शकतात.

३ एक महिन्यानंतर रूग्णाला नियमित आहार सुरू केला जातो. पण काहीही खाताना त्यांना हळूहळू खावे लागेल. भूक लागल्याने जास्त खाऊ नयेत, यासाठी दर दोन किंवा तीन तासांनी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ·

४ साखर आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावेत. तळलेले किंवा जंकफूड खाऊ नयेत. काही महिन्यानंतर भूक जास्त लागू शकते. यावेळी चुकीचे पदार्थ खाणे चालू ठेवल्यास वजन पुन्हा वाढू शकते. कोंबडी, अंडी, मांस आणि पनीर यांसारख्या प्रोटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

५ शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन महिन्यांनी नियमितपणे चालणे, योगा करणे, पोहणे यांसारखे व्यायाम करणे आवश्यक आहे. सहा महिन्यांनंतर व्यक्ती हळुहळु कार्डिओ वर्कआऊट्सही करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *