लग्नाच्या वरातीत नाचतांना नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्वतःच्या लग्नाच्या वरातीत नाचतांना नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये समोर आली आहे.
गुजरातच्या बडोद्यातील रनोली गावात हा प्रकार घडला. लग्नाच्या वरातीतच नवरदेवाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून यात नवरदेव सागर सोलंकी लग्नाच्या वरातीत नाचतांना दिसत आहे.
त्याचे मित्रही त्याच्या लग्नाच्या जल्लोष साजरा करत असून सागरचा मित्र त्याला खांद्यावर घेऊन नाचतोय. मात्र नाचता-नाचता अचानक सागरला चक्कर आली आणि त्यानं मान खाली
टाकली.
क्षणभर या प्रकाराचं गांभीर्य कोणालाही लक्षात आलं नाही. मित्रांनी त्याला खाली उतरवलं त्यावेळी तो शुद्धीतचं नव्हताच. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं. मात्र
दाखल करण्यापुर्वीचं हार्टअटॅकमुळे सागरचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. सागरच्या अशा अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला.