कामावरून कमी केल्यामुळे कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न
जय महाराष्ट्र न्यूज, बार्शी
बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधून कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.
वैरागमधल्या कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखेच्या कार्यालयातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
एकनाथ निलाखे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होते.
8 महिन्यापुर्वीच त्यांना कामावरून कमी करण्यात आलं.याप्रकरणी निलाखेंच्या पत्नीने तक्रार दाखल केली.
एकनाथ निलाखेंना दोन महिन्याचा पगार दिला नसताना मुख्य प्रशासक राजेंद्र मिरगणे हे वारंवार धमक्या द्यायचे असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.