Sat. Sep 18th, 2021

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यानिमित्तामे न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाचा २०२० या वर्षातील पहिलाच परदेश दौरा आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

धवनला झालेल्या दुखापतीमुळे धवनला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले आहे.

यामुळे वनडे सीरिजमध्ये टीम इंडियात धवनऐवजी मुंबईकर पृथ्वी शॉ याला संधी दिली गेली आहे. तर टी-२० सीरिजमध्ये धवनच्या जागी संजू सॅमसन खेळणार आहे.

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध ३ वनडे मॅच खेळणार आहे.

वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रुषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर आणि केदार जाधव.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज

पहिली वनडे, ५ फेब्रुवारी, सिडन पार्क, हॅमिल्टन.

दुसरी वनडे, ८ फेब्रुवारी, इडन पार्कस ऑकलंड.

तिसरी वनडे, ११ फेब्रुवारी, बे ओव्हल, माऊंट मांगनुई

दरम्यान टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी-२० सीरिजपासून होणार आहे.

२४ जानेवारीपासून टी -२० सीरिजला सुरुवात होत आहे. न्यूझीलंड विरुद्ध एकूण ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रुषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांचे वेळापत्रक

२४ जानेवारी, पहिली टी-२०, ऑकलंड

२६ जानेवारी, दुसरी टी-२०, ऑकलंड

२९ जानेवारी, तिसरी टी-२०, हॅमिल्टन

३१ जानेवारी, चौथी टी-२०, वेलिंग्टन

२ फेब्रुवारी, पाचवी टी-२०, माउंट मोंगनूई

संबंधित बातम्या : टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल, २४ जानेवारीपासून टी-२० सीरिज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *