Thu. Apr 22nd, 2021

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडिया १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडेची मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचा २०२० या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.

टीममध्ये हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे.

असा असेल टीम इंडियाचा दौरा

टीम इंडियाचा भरगच्च असा न्यूझीलंड दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या ५ मॅचच्या टी-२० सीरिजसाठी घोषणा केली आहे.

या टी-२० मालिकेसाठीचे नेतृत्व विराट कोहलीकडे असेल. तर कमबॅक केलेल्या रोहितकडे टीम इंडियाचे उपकर्णधारपद असणार आहे.

अधिक वाचा : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज 14 जानेवारीपासून

यामध्ये ५ वर्षांनी टी-२० मध्ये पुनरागमन केलेल्या संजू सॅमसनला संधी मिळेल अशी आशा क्रिकेटप्रेमींची होती. पण संजू सॅमसनला संधी मिळालेली नाही.

तर ऋषभ पंतला वारंवार संधी का देण्यात येतेय, असा सवाल देखील क्रिकेटप्रेमींकडून केला जातोय.

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जस्प्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांचे वेळापत्रक

२४ जानेवारी, पहिली टी-२०, ऑकलंड

२६ जानेवारी, दुसरी टी-२०, ऑकलंड

२९ जानेवारी, तिसरी टी-२०, हॅमिल्टन

३१ जानेवारी, चौथी टी-२०, वेलिंग्टन

२ फेब्रुवारी, पाचवी टी-२०, माउंट मोंगनूई

अधिक वाचा : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *