टीम इंडियाचे ‘हे’ खेळाडू मालामाल, बीसीसीआयकडून वार्षिक मानधन कराराची घोषणा

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची २०१९-२०२० या कालावधीसाठी वार्षिक मानधनाच्या कराराची यादी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी वार्षिक मानधनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या एकूण २७ खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
ए प्लस, ए, बी आणि सी अशा एकूण ४ टप्प्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची वर्गवारी करण्यात आली आहे.
अधिक वाचा : विराट कोहलीला ICC चा ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार
बीसीसीआयने जाहीर केलेल्या जाहीर केलेल्या वार्षिक वेतन करारमधून महेंद्र सिंह धोनीला वगळण्यात आले आहे.

ए प्लस वर्गवारीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जस्प्रीत बुमराह यांचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे.
तर केएल राहुलला बढती मिळाली आहे. केएल राहुलचा ए श्रेणी समावेश केला गेला आहे.
मागील वर्षाच्या वेतन करारामध्ये राहुलला ब श्रेणीत ठेवण्यात आले होते.
ए प्लस ग्रेड असलेल्या खेळाडूंना १२ महिन्यांसाठी ७ कोटी मानधन मिळणार आहे.
तर ए ग्रेड खेळाडूंना ५ कोटी मिळतील.
बी ग्रेड खेळाडूंना ३ तर सी ग्रेड खेळाडूंना १ कोटी रुपये मिळणार आहेत. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी वेतन करार असणार आहे.
ए प्लस ग्रेड खेळाडू
ए प्लस ग्रेड मध्ये टीम इंडियाच्या ३ खेळाडूंचा समावेश ठेवण्यात आलं आहे.
यामध्ये कॅप्टन विराट कोहली, उपकर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आणि जस्प्रीत बुमराह यांचं स्थान कायम ठेवण्यात आलं आहे.
ए ग्रेड खेळाडू
ए ग्रेड मध्ये टीम इंडियाचे एकूण ११ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
यात फिरकीपटू आर. आश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, के.एल. राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत.
ए ग्रेड श्रेणी मधून महेंद्र सिंह धोनीला वगळण्यात आले आहे.
या खेळाडूंना ५ कोटी वार्षिक मानधन मिळणार आहे.
बी ग्रेड खेळाडू
बी श्रेणीमध्ये एकूण ५ प्लेअरना स्थान मिळालंय.
यात ऋद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहाल, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल यांना स्थान देण्यात आलं आहे.
या ५ प्लेअरना वार्षिक वेतन म्हणून ३ कोटी मिळणार आहेत.
तर ऋद्धीमान साहाला वेतन करारात बढती मिळाली आहे.
गेल्या वेळेस साहाचा समावेश क श्रेणीत केला गेला होता.
मागील वर्षी ब श्रेणीत ४ खेळाडूंचाच समावेश करण्यात आला होता.
सी ग्रेड प्लेअर
सी कॅटेगरीमध्ये टीम इंडियाचे एकूण ८ खेळाडूंचा समावेश केला गेला आहे.
यामध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहार, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर.