Wed. Aug 10th, 2022

राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच

भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली आहे. शिवाय इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीत व्यस्त असेल. गेल्या अनेक वर्षापासून द्रविड हा १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहे. तसेच शिखर धवनच्या नेतृत्वात तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौर्यावर रवाना होणार असल्यानं भारतीय खेळाडूंनी मुंबई गाठली आहे. तर या दौऱ्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांच्या क्वारंटाइन राहावं लागणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात १३ ते २५ जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कोलंबच्या आर. प्रेमादास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही मालिकेचे सर्व सहा सामने खेळले जातील.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, सूर्यकुमार यादव,राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.