Wed. Jun 19th, 2019

अर्जुन पुरस्कारासाठी BCCIकडून ‘या’ चार खेळाडूंची शिफारस

0Shares

राष्ट्रीय खेळांमध्ये सर्वोच्च मानला जाणारा ‘अर्जुन पुरस्कार’ यासाठी क्रिकेटमधील चार खेळाडूंच्या नावांची वर्णी लागली आहे. यापैकी रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावांची शिफारस केली आहे.  BCCI ने या नावांना ‘अर्जुन पुरस्कार’साठी सुचवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या चारही खेळाडूंच्या क्रिकेट क्रीडा प्रकारामधील कामगिरीवर विचार करून या नावांचा विचार केला जात असल्याचं सांगण्यात येतंय.

क्रिकेटसाठी या चार खेळाडूंची वर्णी

अर्जुन पुरस्कारसाठी बीसीसीआयने चार खेळाडूंची नावे पुढे केली आहे.

यामध्ये रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव नावांचा समावेश आहे.

क्रिकेटच्या पूर्वी झालेल्या सामन्यांच्या धर्तीवर आगामी विश्वचषकासाठी रविंद्र जडेजाचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.

तर जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी यां दोघांच्या धुवाँधार गोलंदाजीने विरोधी संघाची दांडी गुल होताना दिसली होती

यामध्ये २७ वर्षीय महिला क्रिकेटर पूनम यादव हिचं नावही विचारात घेतलं गेलंय.

41 ODI मध्ये 63 विकेट्स आणि 54 T20 मध्ये 74 विकेट्सची कामगिरी तिने दाखवली आहे.

‘अर्जुन पुरस्कार’

राष्ट्रीय खेळांमध्ये खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

भारत सरकारने 1961 पासून या पुरस्काराला सुरूवात केली.

3 लाख रूपये रोख रक्कम, कांस्य धातूचा अर्जुनाचा पुतळा (मत्स्यवेध घेणाऱ्‍या धनुर्धारी अर्जुनाच्या शिल्पाकृती) आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं.

भारतातील  क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराला सुरूवात करण्यात आली होती.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: