24 हजार वर्षापुर्वीचा जीव पुन्हा झाला जिवंत ; जगभरातील शास्त्रज्ञही चकीत

नवी दिल्ली : या पृथ्वीतलावर अनेक प्रकारचे जीव वास्तव्य करतात. काही हजारो वर्षांंपुर्वी पृथ्वीवर डायनासोरसारख्या महाकाय प्राण्याचं अस्तित्व होतं. मात्र अचानकपणे उल्कापिंड, धूमकेतु आणि क्षुद्रग्रह यासारख्या गोष्टी पृथ्वीवर कोसळल्याने भयानक विनाश झाला आणि यातचं डायनासोर नष्ट झाले. युरोप आणि रशियाच्या सीमेवर असणाऱ्या सध्याच्या सायबेरियन हिमपर्वताखाली हे डायनासोर दबले गेले असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. सध्या आपण कोरोनाला घाबरतो. पण कोरोनापेक्षाही अधिक भयानक रोग या सायबेरियन हिमपर्वताखाली आहे. तापमान वाढीमुळे हळूहळू सायबेरियन बर्फ वितरळत असल्यानं आता त्याखाली दबले गेलेले प्राणी उघडे पडू लागले आहेत. असाच एक दबलेला प्राणी 24 हजार वर्षांनी पुन्हा जिवंत झाला आहे.
सायबेरियामध्ये नुकताच निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आढळला आहे. इथं गेल्या 24 हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्म जीव पुन्हा जिवंत झाला आहे. तसेच या प्राण्यांचं नाव ‘बडेलॉईड रोटिफर’ असं आहे. करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. हा जीव नुसताच पुन्हा जिवंत झाला असून, त्यानं स्वतःचा क्लोनदेखील यशस्वीरित्या तयार केला आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांनी या प्राण्याच्या अस्तित्वावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. पृथ्वीवर अनेक जीव हे हजारो वर्षांपासून आहे. फक्त कालांतराने या जीवनामध्ये फरक पडला होता. आजही बहुपेशीय प्राणी क्रिप्टोबायोसिस अवस्थेत म्हणजेच मेटाबॉलिजम पुर्णपणे बंद करून हजारो वर्षांपर्यंत बर्फाखाली जिवंत राहू शकतात, हा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे. तसेच रेडीओकार्बन डेटींगच्या माध्यमातून या प्राण्याच्या वयाचे अनुमान लावण्यात आले. यानुसार या प्राण्याचे वय 23,960 ते 24,485 वर्षांदरम्यान आहे. कार्बन डेटींगमध्ये संबंधीत प्राण्याचा हाफ लाईफ पिरियड मोजला जातो. काही दिवसांपूर्वी, नेमॅटोड नावाचा किडा 30,000 वर्षांनंतर पुन्हा जिवंत झाल्याची घटना समोर आली होती. असंच जर हिमपर्वताखाली लपलेले जीव पुन्हा जिवंत झाले तर ही सृष्टी धोक्यात येऊ शकते. याशिवाय शेवाळ आणि वनस्पती ज्या बर्फाखाली हजारो वर्षांपासून होत्या, त्या आता पुन्हा वाढू लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांसमोर आता नवं आव्हान उभं राहत आहे.