Sat. May 25th, 2019

व्हॉट्सअॅपवरील ‘या’ चुका पडू शकतात महागात

0Shares

आपले अॅप इंट्रेस्टिंग बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी नवनवीन फीचर जोडत असतो. परंतु याचा गैरफायदा घेणारेही वाढत चालले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता नव्या फीचरसोबतच नवीन नियमही बनवत आहे. व्हॉट्सअॅप कंपनी या नियमांसह सर्वांना सावधही करत आहे.

आता व्हॉट्सअॅपवरील तुमची एक चुक तुम्हाला गोत्यात आणू शकते म्हणून ही सावधगिरी पाळा.

  • हिंसा पसरवणारे मेसेज पाठवू नका
  • बनावट अकाऊंट तयार करु नका
  • जे लोक तुमच्या कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत अशांना तुम्ही वारंवार मेसेजेस करु नका
  • व्हॉट्सअॅपच्या अॅप कोडसोबत छेडछाड करू नका
  • व्हायरस आणि मालवेअर दुसऱ्यांना पाठवणं हे देखील व्हॉट्सअॅपच्या नियमांविरोधात आहे.

बेकायदेशीर, अश्लील किंवा धमकी देणारे, तणाव निर्माण करणारे मेसेजेस पाठवणाऱ्या यूजर्सना व्हॉट्सअॅप बॅन करणार आहे. तसंच या अॅपचा चुकीचा वापर केल्यास तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. शिवाय कंपनी तुम्हाला बॅन करण्याआधी त्याची पूर्वकल्पनाही व्हॉट्सअॅप देणार नाही.

व्हाट्सअॅपने मान्य केली भारत सरकारची ‘ही’ मागणी

फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *