Sun. Oct 24th, 2021

जेव्हा विदेशी दारुचा ट्रक उलटतो हे घडतं…..

मालेगाव ते वसमत रोडवर विदेशी दारूच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी  झाला आणि लोकांची या ठिकाणी गर्दी झाली. या गर्दीमध्ये तळीरामांची संख्या जास्त होती. या घटनेने  या परिसरातील तळीरामांचा रविवार फुकट साजरा झाला. औरंगाबादहून आंध्रप्रदेशकडे विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटला. यांमध्ये ड्रायव्हर जखमी झाला असून त्याला न उचलता  दारू व दारूचे बॉक्स उचलण्यात हे तळीराम व्यस्त होते. या ट्रकमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाची दारू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

नेमकं काय घडलं ?

औरंगाबादहून आंध्रप्रदेशकडे विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक मालेगाव ते वसमत रोडवर पलटला.

दारूच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी  झाल्याने लोकांची या ठिकाणी गर्दी झाली.

या घटनेने  या परिसरातील तळीरामांचा रविवार फुकट साजरा झाला.

ट्रक पलटी झाल्यावर जखमी ट्रक ड्रायव्हरला मदत करणे सोडून या रस्त्यावरील ये जा करणाऱ्या लोकांनी  बियरचे बॉक्स नेण्यास पसंती दिली.

पोलीस प्रशासनास घटनास्थळी पोहोचताच त्यांनी दारूची लूट थांबली.

या ट्रकमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाची दारू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *