Tue. Oct 27th, 2020

मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय

प्रत्येकाला वाटते की, आपण सुंदर दिसावे. आपली त्वचा तजेलदार आणि मुलायम असावी. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आपण नानाप्रकारचे उपाय करतो. महागडे प्रोडक्टस वापरतो. पण परिणाम मात्र शून्य असतो. मात्र काही सोपे घरगुती उपायदेखील तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार करू शकतात.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं ऑक्सिडंट असतं. जे त्वचेचं कडक उन्हापासून रक्षण करतं.

त्याचबरोबर हे यूव्ही रेजमुळे त्वचेला होणाऱ्या सनबर्नपासूनही वाचवतं.

यामध्ये व्हिटॅमिन- सी भरपूर प्रमाणात असते.

यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते.

दही

दही तुमच्या त्वचेसाठी एक वरदान आहे.

दही काही वेळासाठी त्वचेवर लावून ठेवून तसंच ठेवा.

सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.

चेहरा उजळण्यास मदत तर होईल त्याचबरोबर चेहऱ्यावरील पिंपल्सही जातील.

मध

त्वचेचा जास्त काळ उन्हाशी संबंध येत असेल. तर त्वचा काळवंडते.

बऱ्याच वेळा त्वचा निस्तेज होते. त्यामुळे त्वचा मुलायम करण्यासाठी मधाचा उपयोग होतो.

साधारण 15 मिनिटांसाठी मध चेहऱ्यावर लावून ठेवा.

यामुळे त्वचा सॉफ्ट तर होईलच, पण त्वचेच्या इतर समस्याही दूर होतील.

संत्रं

संत्र्याचा पल्प 2 चमचे घ्या.

त्यात चिमूटभर हळद एकत्र करा.

तयार मिश्रण आपल्या चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी लावा.

सकाळी चेहरा धुवून टाका.

यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि मृत पेशी दूर होऊन त्वचेचा रंग उजळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *