Thu. Jul 18th, 2019

‘तिच्या’मुळे त्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान

0Shares
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मतदान केंद्रावर अनेकदा गंमतीशीर किस्से घडत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा ‘तिची’ सुरू आहे. तिची म्हणजे कोण ?असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल. पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी लखनऊच्या मतदान केंद्रावर पिवळ्या रंगाची साडी घातलेल्या महिलेची चर्चा सुरू होती. तिच्यामुळे त्या मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान झाल्याचे म्हटलं जात आहे.

नेमकी ‘ती’ आहे कोण ?

निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या एका देखण्या महिलेचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मतदान केंद्रावर दाखल झाल्यानंतर पिवळ्या रंगाची साडी घातलेली महिला, हातात EVM मशीन घेऊन जातानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.
या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती निवडणूक अधिकारी होती.
ही महिला ज्या मतदान केंद्रावर काम करीत होती त्याठिकाणी 100 टक्के मतदान झाल्याची चर्चा सुरू आहे.
ही महिला नलिनी सिंह असल्याचे अनेकांनी म्हटलं असून तर मिसेस जयपूर नलिनी सिंह असल्याचे दावा केला जात आहे.
या महिलेला लखनऊ शहरातील नगराम भागातील 173 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर निवडणूक ड्यूटी लावण्यात आली होती.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *