‘या’मुळे उरीला मिळाले 2018चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

लोकसभा निवडणुकांंमुळे लांबलेल्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये उरी चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात्कृष्ट दिग्दर्शकपासून सर्वात्कृष्ट अभिनेतापर्यंत पुरस्कार मिळाले आहेत. मात्र 2019ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला 2018चे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कसा मिळाला ? अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
नेमकं नेटकरी म्हणतायेत तरी काय ?
66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यावर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट 11 जानेवारी 2019 रोजी रिलीझ झाला आहे.
मात्र हा चित्रपट 2019 ला रिलीझ झाला असून सुद्धा 2018चे राष्ट्रीय पुरस्कारात कसा समावेश करण्यात आला ? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
काही कारणांमुळे चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केल्याचे समजते आहे.
उरीला 31 डिसेंबर 2018 रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत समावेश केला होता.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत मानांकन मिळविण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असते.
उरी हे सर्टिफिकेट 31 डिसेंबरलाच मिळाले असल्याचे म्हटलं जात आहे.
उरीला सर्वाकृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, बॅकग्राउंड म्युझिक आणि साउंड डिझाइन यासाठी पुरस्कार देण्यात आले आहे.