Tue. Feb 25th, 2020

अरुण जेटलींनी राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी – सुब्रमण्यम स्वामी

मोदी सरकारच्या काळात माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र माजी अर्थमंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जेटलींच्या कार्यकाळात घेतलेल्या आर्थिक निर्णयांवर घणाघाती टीका केली आहे. जेटली यांच्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी आली असून जनतेला प्रचंड कर भरण्यास भाग पाडल्यामुळे आर्थिक मंदी जाणवू लागल्याचे म्हटलं आहे.

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी ?

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे.

तसेच जनतेवर मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे आर्थिक मंदी जाणवू लागली आहे.

देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे देखील कलम 370 हटवण्या इतकंच महत्त्वाचे आहे.

कलम 370 हटवण्याबाबत माझा सल्ला घेतला मात्र आर्थिक धोरणाबाबत सल्ला घेतला नसल्याची नाराजी सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी जेटलींवर केलेल्या टीकेमुळे भाजपला घरचा आहेर दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी वक्तव्य केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *