Jaimaharashtra news

बीडमध्ये २४ तास मृतदेह रुग्णाशेजारी पडून

बीड येथील शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग वसतिगृहात कोरोना वार्डातील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जवळजवळ २४ तास मृतदेह रुग्णाशेजारीच पडून होता. दोन महिला असणाऱ्या खोलीमध्ये २४ तास मृतदेह बांधून ठेवला गेला होता.

रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला माहिती देऊनही मृतदेह लवकर हलवण्यात आला नाही. शेजारी मृतदेह असल्याने महिला रुग्णाच्या मनात भीतीचे वातावरण होते. यातून रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.

Exit mobile version