बीडमध्ये बनावट नोटा छापून बाजारपेठेत आणणारे टोळी अटकेत
बीडमध्ये बनावट नोटा छापून बाजारपेठेत आणणारे टोळी अटकेत आली आहे

बीडमध्ये बनावट नोटा छापून बाजारपेठेत आणणारे टोळी अटकेत आली आहे. बीड जिल्ह्यातील धारूरमधील ग्राहक सेवा केंद्रात बनावट नोटा छापायचे केंद्र असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी आकाश माने, संदीप आरगडे, निखील संभेराव यांना अटक करण्यात आली असून दोन लाख 85 हजार 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
दरम्यान आरोपी 20 हजार खऱ्या रुपयांच्या मोबदल्यात 1 लाख रुपयाच्या खोट्या नोटा देते होते. औरंगाबाद सिडको पोलिसांची कारवाई सुरु आहे.