Fri. Jun 21st, 2019

राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानींची फ्रान्सभेट

24Shares

सध्या चर्चेत असलेल्या राफेल विमान खरेदी कराराबाबत रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत.

दरम्यान राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असा गौप्यस्फोट झाल्याने हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत.

राफेल विमान करारामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला मिळालेल्या प्राधान्यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे.

त्याचदरम्यान आज इंडियन एक्स्प्रेसने एक वृत्त प्रकाशित करून हा करार होण्यापूर्वी पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असा गौप्यस्फोट केला आहे.

2015 साली मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्यामध्ये ही भेट झाली होती.

त्यावेळी अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

तसेच या बैठकीमध्ये फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जीन वेस ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जीन क्लॉड मेलेट हे सुद्धा सहभागी झाले होते.

राफेल विमान कराराबाबतचा कॅगचा अहवाल आज संसदेसमोर सादर होणार आहे.

या अहवालामध्ये राफेल विमानांच्या किमतीबाबत काय माहिती नमूद करण्यात आली आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

24Shares

Leave a Reply

%d bloggers like this: