Sun. Jun 20th, 2021

बच्चू कडूंनी पदभार स्वीकारण्याआधी केलं ‘हे’ काम

महाविकास आघाडीचे बहुप्रतिक्षित खातेवाटप करण्यात आले. महाविकासआघाडीच्या एकूण 43 मंत्र्यांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. यासह या मंत्र्यांना सरकारी बंगले देखील देण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. यामध्ये नवाब मलिक, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड यासारख्या अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला.

राज्यमंत्री बच्चू कडू (State Minister Bacchu Kadu )आज आपल्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

याआधी त्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्या समोर रक्तदान ( Blood donation ) केले आहे. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.

बच्चू कडू यांनी रक्तदान करतानाचा एक फोटो ट्विट केला आहे.

प्रहारच्या कोणत्याही आंदोलनाची किंवा चांगल्या कामाची सुरुवात रक्तदानापासून होते. मी आज मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहे.

या शुभप्रसंगावर मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे, असे ट्विटमध्ये बच्चू कडू म्हणाले

बच्चू कडू यांनी याआधी अनेक वेळा रक्तदान केले आहे.

रक्तदानासाठी आवश्यक असलले वजन कमी असताना देखील त्यांनी खिशात दगटगोटे टाकून वजन वाढवून रक्तदान केलेले आहे.

बच्चू कडू यांच्याकडे एकूण 8 खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांची जबाबदारी दिली आहे.

बच्चू कडू यांना रॉकीहिल टॉवर 1202 हा बंगला देण्यात आला आहे. बच्चू कडू यांना मंत्रालयाऐवजी विधानभवनात दालन देण्यात आलं आहे.

दरम्यान बच्चू कडू यांना मिळालेला बंगला हा स्मशानभूमीच्या शेजारी आहे.

शुभ अशुभ यापेक्षा अपंगांना सोयीचा असणारा बंगला आणि कार्यालय हवं होतं.

तरीही मिळालेले कार्यालय स्वीकारुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *