Sat. Jul 31st, 2021

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना फायदा झाला – रामनाथ कोविंद

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविं यांच्या अभिभाषणाने संसदेची मोदी सरकारच्या कार्यकाळातले हे अखेरचे अधिवेशन आहे.

उद्या म्हणजेच शुक्रवारी पीयूष गोयल संसदेत हंगामी अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याने गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, पहिल्या दिवसापासूनच सरकारचे ध्येय होते की, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सोयी-सुविधा पोहोचाव्यात.

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून नवीन भारत बनवण्याच संकल्प सोडला होता. त्यानुसार गेल्या साडेचार वर्षात प्रयत्न करण्यात आले.

महात्मा गांधींच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकारने देशाला संपूर्ण स्वच्छ बनवण्याचा संकल्प घेतला. त्यानुसार, स्वच्छ भारत योजनेतून 9 कोटींपेक्षा अधिक शौचालायांची निर्मिती करण्यात आली.

उज्वला योजनेंतर्गत आजवर 6 कोटींपेक्षा अधिक लोकांना गॅस जोडणी देण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा केवळ चार महिन्यांतच 10 लाखांहून अधिक लोकांनी फायदा घेतला.

आयुष्यमान योजनेतून 50 कोटी लोकांवर उपचार करण्यात आले. जनऔषधी परियोजनेंतर्गत जनआरोग्य केंद्रात 700 पेक्षा अधिक औषधे कमी किंमतीत उपलब्ध करुन दिली जात आहेत.

किडनीच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी सरकारने मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 21 कोटी लोकांना वीमा योजनेचे कवच उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

यासाठी सुमारे 3000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कुपोषण दूर करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन सुरु केले.

संपूर्ण लसीकरणासाठी इंद्रधनुष्य योजना सुरु केली. सरकारकडून नवी मेडिकल कॉलेजेस सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला होता.

तसेच सरकारने तरुणांसाठी कौशल विकास अभियान सुरु केले. त्याअंतर्गत आगामी काळात 15 पेक्षा जास्त आयटीआय, 6 हजारांपेक्षा अधिक कौशल विकास केंद्र सुरु होतील.

मुद्रा योजनेंतर्गत 4 कोटी 26 लाख लोकांनी कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरु केला. स्टार्टअप योजनेमुळे भारताचे नाव जगात आघीडीवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *