एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी कालपासून उपोषणास बसले होते. मात्र काल यावर तोडगा न निघाल्यामुळे आजही एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र आता एसटी कर्माचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
राज्य सरकारने एसटी कर्माचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे अखेर एसटी कर्माचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
काल पासून संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बससेवा बंद केली होती. एसटी कर्माचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील ७४१ फेऱ्या बंद करण्यात आल्या. एसटी कर्मचारी संपावर जाऊन एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.