Thu. May 13th, 2021

बेळगावात भाजपचं कमळ फुललं

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी झाली असून निकाल समोर आला आहे.या निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी 2903 मतांनी विजयी झाल्या आहेत.

अटीतटीची झालेल्या या निवडणुकीत अगदी शेवच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. 3500 मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर 2903 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे आता बेळगाववर भाजपचा झेंडा फडकला आहे.

बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी (Mangala Angadi), काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके (Shubham Shelke) हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *