Fri. Sep 30th, 2022

आलं खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

आल्याचा चहा सर्वांनाच नेहमी आवडत असतो. हिवाळ्यात आलं घातलेला चहा म्हणजे काही औरच बात. जेवणातही बऱ्याचदा आल्याचा वापर केला जातो. आल्यात अनेक गुणकारी गुणधर्म आहेत. असं असलं तरी आलं खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.

‘हे’ आहेत आलं खाण्याचे फायदे

1-आलं हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
2-पोट साफ होण्यास मदत होते.
3-आल्यातील औषधी गुणधर्म अन्न पचवण्यास मदत करतात.
4- गॅस आणि पोटदुखीच्या समस्या दूर होतात.
5-जेवणात आल्याचा वापर केल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते.

‘हे’ आहेत आलं खाण्याचे तोटे

1-जेवणात आल्याचा वापर केल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. मात्र रक्त पातळ होण्याची प्रक्रिया जलद गतीने झाल्यास आरोदग्यास धोका येऊ शकतो.

2-भाजी मध्ये चवीसाठी आल्याचा उपयोग करतात पण त्यामुळे acidity होऊ शकते.

3- पोट साफ करण्यासाठी आल्याचा अती वापर केल्यास त्याक्षणी जुलाब होण्याची शक्यता आसते.

4-रक्तदाबाचा त्रास जास्त प्रमाणात असेल तर आल्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.