Jaimaharashtra news

कढीपत्ता हा आरोग्यासाठी फायदेशीर

कढीपत्ता हा अनेक पदार्थात टाकल्या जाते. कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन ए, बी आणि ई त्वचेवरील पिंपल हटविण्यास मदत करते. तसेच चेहरा निस्तेज झाल्यास किंवा त्वचा काळवंटली असेल तर कढीपत्त्याची पाने गरम पाण्यात टाका आणि या पाण्याने वाफ घेतली तर लगेचच त्वचा फ्रेश होऊन बदल जाणवू लागते. त्वचेवर आलेले रॅशेस किंवा फोड घालवायचे असतील तर कढीपत्ता टाकून गरम पाण्याने आंघोळ केली तर फायदा नक्की जाणवेल. कढीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे कढीपत्ता अधिकाधिक प्रमाणात सेवन केला तर फायदेशीर ठरतो. असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात.

कढीपत्त्याचे फायदे

१ कढीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे आणि फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेवर पिंपल येणे जवळपास बंद होते.

२ कढीपत्त्याचा फेसपॅक लावला तर निश्चितच हे काळे डाग जाऊ शकतात.

३ कढीपत्ता रक्तशुद्धीकरण करण्याचे काम करतो.

४ कढीपत्त्याचा फेसपॅक त्वचेला ओलावा देत असल्यानं आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असल्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात.

५ कढीपत्त्यामुळे कोरडी त्वचाही व्यवस्थित मॉईश्चराईज होते.

६ वचेवरील अतिरिक्त तेल कढीपत्त्याचा फेसपॅक शोषून घेतो. त्यामुळे ऑईली त्वचेची कटकट दूर होते.

Exit mobile version