Jaimaharashtra news

ड्रॅगन फ्रुट आरोग्यासाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन हे थायलंड, फिलिपाईन्स, मलेशिया, व्हियेतनाम आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये जास्त प्रमाणात घेतात. भारतात देखील 1990 च्या दशकापासून या फळाचे उत्पादन घेत आहे.

ड्रॅगन फ्रुट मध्ये असलेले औषधी गुणधर्म यामुळे याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात भारतात वाढली. तसेच भारतात हळूहळू विविध राज्यातील शेतकरी या फळची लागवड शेतात करत आहे.

भारतात ड्रॅगन फ्रुटची लागवड

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, आणि अंदमान निकोबार या बेटांवर लागवड केली जाते.

ड्रॅगनचे प्रकार

१ गुलाबी त्वचेचे सह पांढरा गाभा
२ गुलाबी त्वचे सह लाल गाभा

ड्रॅगन फ्रुटचे फायदे

ड्रॅगन फ्रुटमध्ये जीवनसत्त्वे ,फायबर, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट हे फार असतात. अँटिऑक्सिडंटमुळे ताणतणावामुळे निर्माण झालेल्या सेलचे नुकसान भरून काढतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रुटमुळे पाचन तंत्र सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे आपल्या आहार
ड्रॅगन फ्रुट हे नक्की असू द्या.

Exit mobile version