भारतीय परंपरेनुसार केळीच्या पानावर जेवण्याचे काय फायदे आहेत?

पूर्वीच्या काळी अन्न थाळीऐवजी केळीच्या पानात वाढलं जात असे. अजूनही अनेकदा शुभप्रसंगी किंवा समारंभात अजूनही केळीच्या पानात जेवण केलं जातं. दक्षिण भारतात अनेकदा केळीच्या पानांतच जेवणं केलं जातं. एवढंच नव्हे, तर लग्न, पूजा विधींमध्येही केळीचे खांब असतातच असतात. पानात जेवल्यावर पान थाळीप्रमाणे धुवायची गरज पडत नाही, हे खरं. मात्र त्याशिवाय केळीच्या पानात जेवण्याचे काय फायदे आहेत, हे वाचल्यावर तुम्हाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल.
केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. कारण केळीच्या पानात जेवल्याने आहारातील पोषक तत्वांची वाढ होते. कारण भारतीय अन्न हे गरम केलेलं असतं. त्यामुळे गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्यावर पानातील द्रव्यं अन्नात मिसळतात. या पानातील फायबर, पोषक मूल्यं अन्नात मिसळतात.
केळीच्या पानांचा किंवा खांबांचा रस सकाळी अनशा पोटी प्यायल्यास किडनी स्टोन्सचा विकार निघून जातो.
केळीच्या पानात जेवल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण राहतात. कारण केळीच्या पानातील अँटीऑक्सिडेंट्स अन्नामार्फत आपल्या शरीरात जातात.
केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते पान त्वचेवर गुंडाळावं. त्यामुळे चेहऱ्यावरील पुरळं, मुरूम, फोड डाग निघून जातात आणि त्वचा मुलायम होते.