Jaimaharashtra news

‘आले’ हे आरोग्यासाठी फायदेशीर

‘आले’ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी, खोकल्यावरील औषध म्हणून सुद्दा आलेचा वापर करतात. तसेच आल्यामध्ये अनेक पोषक तत्व सुद्दा आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच काम आले करते. आलं हे आरोग्य वर्धक असून बायोएक्टिव युक्त आहे आणि हेचं गुणधर्म आरोग्यासाठी अधिक उपयुक्त आहेत. पावसाळा आला की सर्दी , पडसं, खोकला हे सामान्य आहे. यावर आले गुणकारक आहे. आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. आले जर सेवन केलं तर रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते.

आलेमध्ये फेनोलिक असल्यानं अपचन, जलन यापासून आराम मिळतो. आले हे पित्तनाशक आहे. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा झिंगेरॉन हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे. पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी. मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. आल्याच्या या फायद्यामुळे याचा उपयोग औषधीसाठी देखील करतात.

Exit mobile version