Fri. Oct 7th, 2022

पुदीना ही वनस्पती बहुमोलची

पुदीना एक औषधी वनस्पती आहे .ही भुमध्यसागर प्रदेश येथून आल्याचा उल्लेख हा अनेक पुस्तकामध्ये मिळतो. जगात ही वनस्पती अनेक ठिकाणी आढळते. भारतातही सर्वत्र आढळते. भारताच्या उत्तरेकडील काही भागांत पुदीनाची शेती केल्या जाते. पुदीनाचे पान हे तुळशीच्या पानाप्रमाणे असते. ही वनस्पती जमिनीवर पसरणारी व लाल दंडीची असते. भारतात पुदीनाचा उपयोग हा चटणी, कडी, मठ्ठा यामध्ये करतातच शिवाय या वनस्पतीचे महत्त्व आयुर्वेदामध्ये फार अधिक आहेत. ही वनस्पती गुणयुक्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी औषधांमध्ये पुदीनाचा उपयोग होतो तसेच ही वनस्पती त्रिदोषनाशक आहे. पुदिना हा गावाप्रमाणेच रागामध्येही आढळते. या पुदिनेला रान पुदीना असे म्हणतात. रान पुदिनाचा वास हा अत्यंत तीव्र असतो. मात्र गावडी पुदीना आणि रान पुदिनाचे गुणधर्म हे सारखे असतात. सर्दी, खोकला, ताप, ऍसिडिटी, या सारख्या आजारांवर पुदिन्याचा वापर देखील करतात. उलटी खोकला सर्दी यामध्ये अर्धा चम्मचा पुदिन्याचा रस, अद्रकाचा रस आणि एक चमचा सहद टाकून दिले असता लगेच आराम पडतो. तसेच अर्धा चम्मच पुदिन्याचा रस एक चिमुटभर शिंदे मीठ घालून दिले असता पोट दुखी पोटशूळ व पोटातील गॅस त्याचे निवारण होते. पुदिन्याच्या रसाचे 2 थेंब नाकात टाकले असता सर्दी दुरुस्त होते . विंचवाच्या दंशावर पुदिन्याचा पाला वाटून लावले असता दंश यातील विष कमी होऊ होऊन लवकरच आराम होतो. पुदिन्याला जखमेवरती चोळून लावल्यास किंवा चकती करून लावल्यास जखम ही लवकरात लवकर भरून येते आणि दुरुस्त होते. शास्त्रीय मताप्रमाणे पुदिनामध्ये जीवनसत्व ‘अ’ हे अधिक प्रमाणात आहे. ही वनस्पती शरीरात जठराग्नी प्रदीप्त करून भूक वाढते आणि शक्ती प्रधान करते .पुदिना मध्ये थायमोलीन (Thymol )आढळतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.