Fri. Dec 3rd, 2021

म्हणून महिलांनी हातात बांगड्या घालाव्या…

बांगड्या हा महिलांचा महत्त्वाचा अलंकार असतो. सोन्याच्या पाटल्या असो, वा काचेच्या लाल, हिरव्या, रंगीवेरंगी बांगड्या… आपल्या संस्कृतीत बांगड्यांना पूर्वीपासून महत्त्व दिलं जातं. मात्र हे केवळ संस्कृती किंवा फॅशन यापुरतंच मर्यादित नाही. मनगटात बांगड्या भरण्यामागे काही शास्त्रीय कारणंही आहेत, जी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात.

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी वेगाने बदलत असते. मात्र बांगड्या घातल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहातात.

बांगड्यांमुळे शरीराप्रमाणे मानसिक संतुलनही राखलं जातं.

बांगड्यांमुळे प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.

बांगड्या जेव्हा मनगटावर घासल्या जात असतात, तेव्हा हाताच्या शिरांवर अलगदपणे येणाऱ्या दबावामुळे रक्तप्रवाह अधिक सुरळीत व्हायला मदत होते.

जुन्या काळी महिला पुरुषांसमोर येत नसत. अशावेळी त्यांच्या बांगड्यांच्या आवाजामुळे पुरुष मंडळींना त्यांची चाहूल लागे आणि पुरुष महिला असणाऱ्या खोलीत किंवा जागेवर येण्याचं टाळत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *