Wed. Jan 19th, 2022

…तर पुन्हा एकदा बेस्ट कामगारांचा संप होणार – शशांक राव

98 टक्के कामगारांनी संप करावा म्हणून कौल दिला. आज बेस्ट कामगार वडाळा डेपो इथे लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहेत.

आता संप करावा की नाही यासाठी 23 ऑगस्टला बेस्ट कामगारांचे मतदान घेण्यात आले होते या मतदानात 17925 कामगारांनी सहभाग घेतला होता. तर 17497 म्हणजे 98 टक्के कामगारांनी संप करावा म्हणून कौल दिला. आज बेस्ट कामगार वडाळा डेपो इथे लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहेत.

हे धरणा आंदोलन शांतपणे करण्यात येत असून बेस्ट प्रवाशांना कुठल्याही ही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही असे सांगण्यात येत आहे. कामगारांचे वेतन करार का केला जात नाहीये असा प्रश्न बेस्ट कृती समितेचे अध्यक्ष शशांक राव यांनी विचारला आहे.

बेस्ट कामगाराला शिवसेना देशोधडीला लावत आहे. मात्र बेस्ट कामगार शांत बसणार नाही. जर प्रशासनाने लवकरात लवकर कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही. तर पुन्हा एकदा बेस्ट कामगारांचा प्रश्न चिघळेल आणि त्याला फक्त शिवसेना जबाबदार असले असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे.

बेस्ट कामगारांना साथ मिळत नाही. त्यामुळे 98% कामगार म्हणाले संप करावा असा निर्णय दिला आहे.  शिवसेना नेता म्हणाले आहेत पुढील दोन दिवसात वेतन करार लागू करून देतील याची प्रतिक्षा आहे. पुढील दोन दिवसात सत्ताधारी म्हणाले आहेत की करार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *