Fri. Aug 12th, 2022

बेस्टच्या ताफ्यात २१०० इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

मुंबईतील बेस्टच्या ताफ्यात आता एसी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. बेस्टने हैदराबादच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीसोबत ३ हजार ६७५ कोटी रुपयांचा करार केला असून येत्या काळात बेस्टच्या ताफ्यात २१०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार आहे.

काय आहे एसी बसचे वैशिष्ट्ये?

इलेक्ट्रिक एसी बस १२ मीटर लांबीची असणार आहे.


या एसी बसमध्ये ३५ प्रवासी बसू शकतात आणि २४ प्रवासी उभे राहू शकतात.


बसमध्ये व्हीलचेअर प्रवेश, जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित आयटीएमएस, पॅनिक बटण आणि एअर सस्पेंशनची सुविधेची सोय असणार आहे.


एसी ई-बस प्रवासासाठी ६ रुपये भाडे असणार आहे.


बेस्टच्या ताफ्यात २१०० इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल.


सध्या ऍलेक्ट्राकंपनीच्या ४० बसेस बेस्टच्या ताफ्यात.


३,६७५ कोटी रुपयांचा करार झाला आहे.


हैदराबादच्या ऍलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.