प्रेमभंगामुळे तो बनला ‘बेवफा चहावाला’

प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेले दारूचा प्याला जवळ करताना आपण सिनेमात किंवा प्रत्यक्षात पाहिलं असेल. ‘बेवफा बार’ पण ऐकलं असेल. पण लखनौमधील ‘बेवफा चायवाला’ तुम्हाला माहीत आहे का? लखनौमध्ये धोका देऊन गेलेल्या गर्लफ्रेंडची आठवण म्हणून एका मजनूने चक्क चहाचं दुकान टाकलं. विशेष म्हणजे प्रेमभंग झालेल्यांना तो चहामध्ये सवलत देतो. सध्या तरुणांमध्ये हे दुकान खूपच लोकप्रिय ठरले असून,येथे प्रेमभंग झालेल्यांना चहापाण्याच्या बिलामध्ये खास सवलत मिळते.
चहामध्ये खास सवलत
आदित्य सिंह असे या बेवफा चहावाल्याचे नाव आहे.
लखनौमध्ये Fun मॉलजवळ त्याचं दुकान आहे.
त्याच्या दुकानात चहासोबतच बकवास कॉफी, बदनाम कॉफी, बेईमान मॅकरोनी अशी चित्रविचित्र नावं असलेले पदार्थ मिळतात.
हे पदार्थ आदित्यच्या ‘बेवफा’ प्रेयसीला आवडत होते.
प्रेमभंग झाल्यावर आपण चहाचे दुकान उघडण्याचे ठरवले.
यासाठी त्याला बेवफा चहावाला असे नाव दिले.
या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे लैला- मजनूंना इथे 15 रु.दराने चहा मिळतो.
तर प्रेमभंग झालेल्यांना 10 रुपयात चहा मिळतो.
प्रेमभंग झालेले अनेक लोक इथे चहा पिण्यासाठी येतात आणि आदित्यची विचारपूसही करतात.