Mon. Jan 24th, 2022

सावधान ! मुंबई लोकलमध्ये बॅग एक्सचेंज थेफ्ट गॅंग सक्रीय; ‘अशी’ करतात चोरी

दिवसें दिवस चोरीचे प्रमाण वाढत असताना मुंबईत सध्या बॅग एक्सचेंज थेफ्ट गॅंग सक्रीय झाले आहेत. लोकलमध्ये असलेल्या रॅकवर बॅग ठेवल्यानंतर ही गॅंग रिकामी बॅग त्याजागी सोडून प्रवाशांची बॅग चोरत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे रॅकवर बॅग ठेवल्यानंतर निवांत झोपू नका किंवा बॅग ठेवल्यानंतरही बॅगवर लक्ष असू द्या असा सल्लाही रेल्वे पोलिसांनी दिला आहे.

नेमकं काय घडतं ?

सध्या मुंबईच्या लोकलमध्ये बॅग एक्सचेंज थेफ्ट गॅंग सक्रीय झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

लोकलने प्रवास करताना प्रवासी आपली बॅग लोकलमध्ये असलेल्या रॅकवर ठेवतात.

याचा फायदा ही बॅग एक्सचेंज थेफ्ट गॅंग उचलत आहेत.

प्रवाशांनी रॅकवर बॅग ठेवल्यानंतर प्रवाशांचे लक्ष नसताना किंवा झोपत असताना रिकामी बॅग ठेवून प्रवाशांची बॅग उचलत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

त्यामुळे रॅकवर बॅग ठेवल्यानंतर निवांत झोपू नका किंवा बॅगेवर आपलं लक्ष ठेवा असा सल्ला रेल्वे पोलिसांनी दिला आहे.

रेल्वे पोलिसांनी अशाच बॅग एक्सचेंज थेफ्ट गॅंग अटक केले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या गॅंगच्या सदस्याला प्रवाशांनी पकडल्यानंतर चुकून बॅग घेतल्याचे सांगतात.

अनेक प्रवाशांच्या अशा बॅग चोरीला गेले असून बॅग सापडल्यानंतर आपले वस्तू यामध्ये सापडत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *