Wed. Nov 13th, 2019

श्रावणाच्या पहिल्या शनिवारी भद्रा मारुती दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्रावण महिना सुरु झालाय. या पावन महिन्याचा आज पहिलाच शनिवार असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेला महत्त्व असते. हनुमानही महादेवाचंच रूप असल्याने शनिवारी शिवभक्त ‘भद्रा मारुती’च्या दर्शनाला येतात.

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिना हिंदू धर्माचा पवित्र महिना समजला जातो. या महिन्यांमध्ये महादेवाच्या भक्तीला महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त ‘भद्रा मारूती’ च्या दर्शनाला येतात.

काय आहे भद्रा मारूतीचं वैशिष्ट्य?

भद्रा मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे येथे हनुमानाची उभी कंवा बसलेली मूर्ती नाही.

इथे हनुमान चक्क आडव्या निद्रिस्त रूपात आहे.

खुलताबादचा परिसर पूर्वी भद्रावती नावाने ओळखला जाई.

येथे भद्रसेन राजा राज्य करत असे.

हा राजा श्रीराम आणि हनुमान यांचा भक्त होता.

भद्रसेन स्वतः देवाची भजनं गात असे.

त्याचा गळा गोड होता. आवाज मधुर होता.

असं म्हणतात की राजा भद्रसेनाचं गोड भजन ऐकताना रामभक्तीत तल्लीन होऊन मारूतीराया तेथेच पहुडला.

या मुद्रेला भद्र समाधी म्हटलं जातं.

राजाने जेव्हा हनुमानाला या मुद्रेत पाहिलं तेव्हा याच मुद्रेत येथे राहण्याची विनंती राजाने केली.

हनुमानाने राजाला आशीर्वाद देऊन प्रस्थान केलं, पण मारुतीची मूर्ती याच भद्रा मुद्रेत येथे साकारली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *