Sat. Jul 2nd, 2022

भाजपकडून ‘या’ नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

भाजपकडून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठीचा असलेला तिढा सुटलेला आहे. भाजपने राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने राज्यसभेसाठी भागवत कराड यांनी उमेदवारी दिली आहे.

भाजपने याआधी २ उमेदवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे तिसरा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे मानले जातात.

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी देऊन, राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र एकनाथ खडसे यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे.

कोण आहेत भागवत कराड ?

भागवत कराड हे मराठवाड्यातील भाजपचे महत्वाचे नेते आहेत.

भागवत कराड यांनी महापौर-उपमहापौर तसेच प्रदेश उपाध्यक्ष यासारखी पदं भूषवली आहेत.

भागवत कराड पेशाने डॉक्टर आहेत. तसेच ते वंजारी समाजाचा नेता अशी त्यांची ओळख आहे.

तसेच भाजपकडून विधानपरिषदेसाठी अमरिश पटेल यांनी उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर, महाराष्ट्रातून या ‘दोघांना’ उमेदवारी

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा १३ मार्च शेवटची तारीख आहे. शरद पवार यांनी राज्यसभेसाठी बुधवारी विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपाईच्या रामदास आठवले यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. तसेच उदयनराजे भोसेले यांनाही उमेदवारी दिली आहे.

राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी २६ मार्चला होणार निवडणूक

रामदास आठवले आज गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे.

राज्यसभेसाठी शरद पवार यांनी दाखल केला अर्ज

राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेवर महाराष्ट्रातले एकूण १९ खासदार दिल्लीत नेतृत्व करतात.

राज्यसभा सभागृह कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेची एकूण २५० इतकी सदस्यसंख्या असते.

दरम्यान शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.