Mon. Jan 17th, 2022

उदय तिमांडे, नागपूर :- भंडाऱ्या मधील अग्निकांडाला आता ४८ तासापेक्षा जास्त अवधी झाला असताना देखील साधी FIR देखील या प्रकरणात दाखल झाला नाही आहे. यावरून शासन आणि प्रशासनाने हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं आहे याची प्रचिती आणि भविष्यात या प्रकरणाचा काय निकाल येईल याचा अंदाज येतो आहे.

हे त्या दहा चिमुकल्याचं दुर्दैवचं होत की त्यांनी अश्या कुटुंबात जन्म घेतला जिथे त्यांचे पालक या हातात कमावून त्याहाताने पोट भरतात. या घटनेत एखाद राजकारणी किंवा सरकार दरबारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच पोर असत तर हे रुग्णालय पर्यटन स्थळ झालं नसत. अनेक प्रश्नांची उत्तरं आता पर्यंत सापडून ३, ४ लोकांवर निलंबनाची कार्यवाही करून राज्यकर्त्यांनी स्वतःची पाठ थोपठून घेतली असती. घटने पासून जवळ जवळ अर्धा डझन मंत्री, स्वतःहा विधानसभा अध्यक्ष आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देखील घटनास्थळी जाऊन आले, त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधला, कर्मचाऱ्यांना भेटले, पीडितांना भेटले पण नेमकं काय घडलं कश्याने घडलं याचा साधा अंदाज देखील या नेत्यांना आला नाही. चौकशी समिती मधील सदस्यांना देखील प्रथमदर्शनी काही सापडलं नाही. जणू काही त्या दहा चिमुकल्यानी रूम मधील ACची  थंडी हवा कमी करण्यासाठी शेकोटी पेटविली त्याचा धुवा झाला आणि सगळं प्रकरण घडलं अश्या अविर्भावात सध्या हे प्रकरण घेतलं जातं आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.

घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याने आता या गोष्टीकडून माध्यमांच लक्ष हटणार आणि हे प्रकरण थंड बसत्यात पडणार कारण त्या चिमकल्याचा बाप घरच्यांचा उदरनिर्वाह करणार की कागदी घोडे नाचविणार, अहो कोर्टात जायला त्याच्या कडे २ रुपये शिल्लक पडणार नाही. त्यामुळे समजदार व्यक्तीने कोर्टाची पायरी चढण्याचा प्रश्नच नाही.

जाऊ द्या हे प्रकरण इतकं फार गंभीर नव्हतच हो कुठं ते १० नवजात बालकांपैकी कोणी देशाचं पंतप्रधान बनणार होत की इतकी चिंता करावी. आता तर पालकांनी दुःख विसराव म्हणून सरकार ने ५ लाख रुपयांचे चेक पण दिले आहेत. निभेल त्यांचं आतुष्यभर त्यात पण साहेब मायबाप गरीब असले किंवा श्रीमंत त्यांच्या साठी बाळ हे सर्वस्व च असत हो ते परत मिळणार नाही याचं दुःख कोणी कस समजू शकेल. पैशाने त्याची किंमत मोजता येणार नाही. याघटनेत कोणाला शिक्षा देऊन पण प्रश्न सुटणार नाही. पण अश्या घटना भविष्यात घडू नये यासाठी कर्मचाऱ्यांना धाक बसावा हे तर यातून दाखवता येईल. सरकारी रुग्णालयातील बहुतेक कर्मचारी हे पंतप्रधानाला पण वॉर्डातून हाकलून लावतील, त्याला पण तुझ्या बापाच हॉस्पिटल आहे का विचारतील. हे नाही केलं तर आपलं पेशंट घेऊन का प्रायव्हेट दवाखान्यात हा सल्ला तर नक्की देतील. त्यावेळी पेशंटच्या नातेवाईकांच्या काय भावना राहत असतील याचा २ सेकंद विचार केला का कधी? हेे यासाठी लिहितोय कारण मी एका अश्या आईला भेटलोय जिने जन्मानंतर आपल्या निरागस चिमुकलीला पाहिलं नाहीये, घटनेनंतर पण पाहिलं नाहीये, आता जेव्हा त्या आईला ही चिमुकली तुमची म्हणून हातात दिली जाईल तेव्हा तिचा आनंद गगनात मावणार नाही, पण खरं सांगू या घटनेच्या वेळी धावपळीत ज्याच्या हातात जो बाळा येईल तो सुरक्षित स्थळी हलविला लहान मुलांच्या हाताला एक स्टिकर असत फक्त ओळखिला ते स्टिकर अनेकांचे निघाले असेल त्यागोंधळात कोण कुठला बाळ इकडे तिकडे झाला असेल देव जाणे, अंतीमसंस्काराच्या वेळी देखील कुठली परीक्षा घेऊन त्या परिवाराला बाळ देण्यात आले, की बाळांची अदलाबदल झाली याचा विचारच न केलेला बरा. असो प्रकरणाला झाले आता तीन दिवस कोणी जिल्हा बंद करा, आणि आता मोमबत्ती रॅली काढावी लागणार, निषेध सभा घ्यावी लागणार, त्यासाठी बॅनर, मीडिया ही सगळी व्यवस्था पण उभी करावी लागणार कारण या बंद मधून, रॅलीतून, शोकसभेतून, मधून पण देशाचे नेते तयार होतात हे विसरून कस चालणार. बाकी चौकशी चालेल, निकाल येईल तो सांगूच, न्याय वगैरे पण कोणाला तरी भेटेलच प्रत्येक वेळी तो पीडितेला भेटला पाहिजे असा निकष नाही त्यामूळे फायनली काय तर..

“जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *