कृषी कायद्यांविरोधात निषेध करत आज ‘भारत बंद’
‘भारत बंद’साठी विरोधकांचा पाठिंबा…

दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होतंच आणि या आंदोलनाला संपूर्ण भारतभरातून समर्थन होते आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचे आंदोलन होतांना दिसत आहे.
शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची घोषणा केली आणि यासाठी विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. देशभरातील १८ विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला तर कामगार संघटना, व्यापारी, वाहतूकदारांकडूनही समर्थन केले आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला जाणार आहे. शिवाय दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले. तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून या कायद्यांमध्ये दुरुस्तीस करण्यात यावी असं आंदोलकांचं म्हणनं आहे.
केंद्राने या कायद्यावर पुनरुच्चार कारायला पाहिजे असं शेतकरी संघटनांच्या पत्रकार परिषदेत याबाबतीत बोलल्या गेलं आहे. या आंदोलनाने दिल्लीसह काही राज्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.