Thu. Jan 20th, 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लतादीदींच्या वयोमानानुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही भारतरत्न लता मंगेशकर यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत आहेत. मी स्वत: रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *