Mon. Jul 4th, 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती उत्तम

भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र लता मंगेशकर यांची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

वयाच्या ९२व्या वर्षी भारतरत्न लता मंगेशकर यांना घरातील कर्मचाऱ्यामार्फत कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पुढचा आठवडासुद्धा भारतरत्न लता मंगेशकर यांना रुग्णालयातच रहावे लागणार आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील ७ ते ८ दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.