‘भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारणार’ – उदय सामंत

मुंबई विद्यापीठाच्या आवारात भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलिना विद्यापीठाच्या समोरील ३ एकर जागेवर हे संगीत महाविद्यालय उभारणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याचेही सामंत म्हणाले.
राज्यातील १५ फेब्रुवारीपर्यतच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. तसेच त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासन विचार विनिमय करून अंमलबजावणीचे सूत्र ठरवणार असल्याचेही उदय सामंत म्हणाले.
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावरही उदय सामंत यांनी मत मांडले आहे. विद्यार्थ्यांनी कायदा सुव्यवस्तेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच एकोप्याचे वातावरण ठेवावे, असे उदय सामंत म्हणाले.
I have to make concessions on creating the impression of being unhappy.