Thu. Jan 27th, 2022

निवडणुकीच्या धामधुमीत, भास्कर जाधव रंगले जाखडी नृत्यात!

दरवर्षी नवरत्रोत्सवात माजी आमदार भास्कर जाधव तुरंबव येथील त्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्यात सहभागी होतात. कमरेला धोतर, त्यावर शेला आणि डोक्यावर पगडी अशा वेशभूषेत सारे ग्रामस्थ नाचतात. या ग्रामस्थांसोबतच भास्कर जाधवदेखील अगदी लहानपणापासून सहभागी होत आले आहेत.

सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीत अनेक मोठ्या पदांवर पोहोचल्यानंतरही त्यांचा नवरात्रात नाचण्याचा नेम चुकला नव्हता.

मात्र पायाला दुखापत झाल्यामुळे गेल्यावर्षी भास्कर जाधव यांना देवीच्या दरबारात नाचता आले नव्हते.

एकाच पायावर दोनवेळा शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते नाचू शकतील असे कुणालाही वाटत नव्हते.

पण देवी शारदेचा अखंड आशीर्वाद आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळेच दुखापतग्रस्त पायानेच ते या नवरात्र उत्सवात बेभान होऊन नाचले. त्यांचं हे नृत्य दरवर्षी ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *