Fri. Nov 15th, 2019

आमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही – भाऊ कदम

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला होता. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून ‘चला हवा येऊ द्या’ च्या टीमने आठवडाभरात माफी मागावी अशी मागणी अॅड. भारद्वाज चौधरी यांनी केली होती. याबाबत आता अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांची जाहीर माफी मागितली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवलं, ते आमच्याकडून चुकून झालं. ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आगरी, कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. अशा शब्दांमध्ये भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

  • 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. यामधील विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला होता.
  • आगरी समाजाच्या भरभरून दागिने घालण्यावरून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये केलेला विनोद हा अयोग्य असून अंगभर दागिने घालणे ही आगरी समाजाची परंपराच असल्याचं अॅड. भारद्वाज चौधरी म्हणाले होते.
  • तसेच भरभरून दागिने केवळ आगरीच नव्हे, इतर समाजाचे लोकही घालतात, मग केवळ आगरी समाजालाच त्यासाठी लक्ष्य का केलंय, असा सवाल पत्राद्वारे केला होता.
  • कोणाची फसवणूक करून किंवा लुबाडून आगरी लोक दागिने घालत नाही. असं असताना कार्यक्रमात आगरी व्यक्तिरेखा अशा पद्धतीने का दाखवली गेली, असाही प्रश्न विचारला होता.
  • जर कार्यक्रमाच्या टीमने माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पत्रातून देण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *