Fri. Aug 12th, 2022

नाशकात साकारण्यात आली भवानी तलवारीची प्रतिकृती

शिवाजी महाराजांनी अनेक पराक्रम भवानी तलवारीनी केले. भवानी तलवार ही शिवाजी महाराजांनी भवानी मातेने दिलेली तलवार असं सांगितलं जातं.

मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये भवानी तलवारीची प्रतिकृती तयार करण्याचं काम सुरु होतं. त्या बहुप्रतिक्षित तलवारीच्या प्रतिकृतीचं काम अखेर पूर्ण झालं आहे.

तसेच ही तलवार आजपासून लोकांना पाहता येणार आहे. या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचं काम छत्रपती सेनेकडून करण्यात आलं आहे.

या तलवारीची निर्मिती 8 टप्प्यात करण्यात आली. तसेच गेल्या १ महिन्यापासून या तलवारीचं काम सुरु होतं.

या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीच लोकार्पण छत्रपती घराण्याच्या वंशज सोनालीराजे यांच्या हस्ते केलं गेलं. १९ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

या शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात येणार आहे. भवानी तलवारीची प्रतिकृती ही या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण असणार आहे.

अशी आहे तलवार

प्रतिकृती असलेली ही भवानी तलवार १३ फुट इतकी लांब आहे. या तलवारीचं ११० किलो इतकं वजन आहे. या तलवारीत ८० किलोचं पातं तर ३० किलो इतक्या वजनाची पितळी मूठ आहे.

या तलवारीवर एकूण १३० मोती आणि ३०० खडे लावण्यात आले आहेत. प्रतिकृतीच्या लोखंडी पात्याला पंचधातूचं कोटिंग करण्यात आलं आहे.

तलवारीच्या म्यानेवरही कोरीव नक्षीकाम करण्यात आलंय. शिवजयंतीनंतर या तलवारीचं पेशवेकालीन सरकारवाड्यात कायमस्वरुपी स्थापना करण्यात येणार आहे.

मूळ भवानी तलवार ही 4 फूट लांब आहे. तर या मूळ तलवारीचं वजन 1200 किलोग्रॅम इतकं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.